Durga Briged : दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पिंपरी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे 15 ऑगस्टला महिलांसाठी विविध स्पर्धा

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दुर्गा (Durga Briged)ब्रिगेड संघटनेतर्फे पिंपरी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4:30 वाजता महिलांसाठी फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे चालू मेट्रो रेलमध्येसुद्धा वॉक असणार आहे. तसेच मंगळागौर या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित राहणार आहे. 

तसेच या ठिकाणी मुलींना प्रोत्साहन वातावरण निर्मितीसाठी दुर्गा ब्रिगेडच्या मुली लाठीकाठी आणि मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करणार आहेत. सर्व साधारण गृहिणीसुद्धा भाग घेऊ इच्छितात, त्यांनी आपली आवडता वेश परिधान करू शकतात.  तसेच सामाजिक कार्यामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा 75 महिलांचा सन्मान सुद्धा करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांना सन्मानित करण्यात येईल असे दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले. ज्या महिला बचत गटांना आणि महिलांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी कृपया दुर्गा ब्रिगेड संघटनेची संपर्क साधावा.
https://youtu.be/jovI-MJU5YE

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.