Pimpri News : बस प्रवासादरम्यान बॅगेतून अडीच लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – बस प्रवासादरम्यान बॅगेतून अडीच लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले. श्रीरामपूर ते पिंपरी बस प्रवासात एका महिलेसोबत बुधवारी (दि.27) ही चोरीची घटना घडली.

याबाबत महिलेने गुरुवारी (दि.28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी श्रीरामपूर ते पिंपरी बस प्रवास करीत होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी महिलेची बॅगमधून 2 लाख 51 हजार रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.