Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा गट – नाव ठेवणार का ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’???

एमपीसी न्यूज : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता नव्या गटाची स्थापना करणार आहेत. या गटाचे नाव ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या भूमिकेवरून पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे.

बंडखोर नेते विरुद्ध शिवसेना नेते हा वाद थांबता थांबत नाहीये. अशातच आज संध्याकाळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांची बैठक घेऊन एका नव्या अध्यायाला सुरु करण्याचे संकेत मिळाले आहेत. यावर आता शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही. त्यांचे नाव वापरून सहानुभूती दाखवू नका. पक्षप्रमुखांनी आदेश दिले नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत, अशी प्रतिक्रिया देत आहेत.

Shivsena : बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांकडे आहेत केवळ 48 तास; नंतर शिवसेनेचे दार होणार बंद

आज दुपारी 4 वाजता दीपक केसरकर (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेणार आहेत. शिंदे गट आता नेमके पुढे काय करणार? 16 आमदारांना दिलेल्या 48 तासाचे काय झाले? ते काय उत्तर देणार? त्यांची पुढची भूमिका काय असेल? ते नवा पक्ष स्थापणार का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे या परिषदेत मिळण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.