Eknath Shinde Update : शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून काढले; तर शिंदे यांनी सोडले मौन

एमपीसी न्यूज :  शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला असून शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सकाळ पासून सुरु असणाऱ्या सर्व चर्चांना एकनाथ शिंदे यांनी मौन सोडून उत्तर दिले आहे. तसेच आपली बाजू देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले? Eknath Shinde Update 

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सकाळपासून प्रसारमाध्यमांवर बरीच चर्चा सुरु होती. ते भाजपला मिळाले, त्यांनी बंड केले, त्यांच्यावर अन्याय झाला अशा बऱ्याच चर्चेनंतर त्यांनी बाळासाहेबी ठाकरे आणि शिवसेनेसोबत आपली असणारी निष्ठा मांडली आहे. ते म्हणाले, कि आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

Shivsena MLA : शिवसेनेचे १३ हून जास्त आमदार फुटणार?; अनेक जणांचा मोबाईल बंद

आपली बाजू त्यांनी स्पष्ट केली असली, तरी शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असल्याने पुढे त्यांना शिवसेना मोठे पद देऊन खूश करत आहे का ते स्वतः यावर नाराज होऊन आपला निर्णय बदलणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.