Pune News : “प्रश्न कठीण असला की साहेब भूमिका घेत नाहीत”, राणेंचा आता शरद पवारांसोबत पंगा

एमपीसी न्यूज : आमदार निलेश राणे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत पंगा घेतला आहे. शरद पवार यांनी सोमवारी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली.

याशिवाय रुमानिया आणि पोलंड सीमेवर अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या कार्याविषयी देखील चर्चा केली. नेमक्या याच मुद्द्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी आज सकाळी ट्विट करून शरद पवारांच्या या कृतीवर निशाना साधला. ते म्हणाले, ” मी एक गोष्ट पवार साहेबांची नेहमी बघतो, जेव्हा काम सुरळीत चालू असतं तिथेच साहेबांचा फोन जातो आणि मग असं पसरवला जातो की साहेबांमुळे प्रश्न सुटला जेव्हा प्रश्न सुटलेलाच असतो. पण प्रश्न कठीण असतो तिथे पवार साहेब भूमिका घेत नाही” निलेश राणे यांच्या ट्विटनंतर शरद पवारांना सोशल मीडियावर ट्रॉल केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.