India Corona Update : दिलासादायक ! देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 915 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 16 हजार 864 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली आली आहे. 

सध्याच्या घडीला देशात 92 हजार 472 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आजवर देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.59 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 14 हजार 023 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.83 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 9.01 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 177 कोटी 70 लाख 25 हजार 914 जणांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 18 लाख 22 हजार 513 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.