Pune Crime News :  चंदननगर परिसरात जुगार अड्ड्यांवर छापा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – चंदननगर परिसरातील स्वामी समर्थ नगर तसेच खराडी नाक्याजवळील अल कुरेशी हॉटेलच्या मागे जुगार अड्ड्यांवर पोलीसांनी छापा टाकला. यावेळी पोलीसांनी  40 आरोपींविरुध्द (Pune Crime News) कारवाई करुन सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी – चंदननगर परिसरातील स्वामी समर्थ नगर खराडी नाक्याजवळ (Pune Crime News) अल कुरेशी हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये,इमारतीच्या रुममध्ये, मोटारसायकलवर बसून पैशावर बेकायदेशीररित्या खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यावेळी पंचांसमक्ष जाऊन सोमवारी रात्री साडेदहा वाजता छापा टाकण्यात आला. त्यावेळी कल्याण मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे 27  आरोपी, खेळविणारे 6 आरोपी व अन्य 7 आरोपी अशा 40 जणांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Pimpri Corona Update : शहरात आज 118 नवीन रुग्णांची नोंद, 82 जणांना डिस्चार्ज

 

 

या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे अशी

मोटार सायकलवर कल्याण मटका जुगार घेणारे, रायटर, मॅनेजर विश्वनाथ बापुराव तिवार (वय 32, रा. लेन नं 12, तुळजा भवानी गल्ली खराडी, पुणे), विजय गौतम संकपाळ ( वय 49, रा. टाटा गार्डन, सातव गॅरेजच्या मागे, यश अपार्टमेंट तळमजला, चंदननगर), सुरज कलसिंग अभंग (वय 43, रा. कंजारभाट वस्ती येरवडा)

 

 

 

पत्राशेडमध्ये, इमारतीच्या रुममध्ये जुगार घेणारे रायटर

शरिफ इस्माईल शेख (वय 35, रा. 216 मंगळवार पेठ जुना बाजार), दत्ता श्रीकांत गायकवाड (वय 32, रा. जावेद राजाराम पाटील नगर लेन नं 2, खराडी), संदीप भगवान चौधरी (वय 42  रा. बकुळी फाटा ढगे वस्ती, गणपती मंदीराजवळ अनुसया पार्क लोणीकंद)

 

त्याशिवाय व्हिक्टर ऊर्फ विकी डॅनियल अन्थोनी, लॅरेन्स ऊर्फ रॅकी यांचा शोध घेण्यात येत आहे.

या कारवाई दरम्यान पोलीसांनी आरोपींकडून तीन लाख 50 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 25 हजार 410, तसेच 1 लाख 30 हजार 500 रुपये किंमतीचे 27 मोबाईल सेटस् व 11 हजार 900 रुपयांचे जुगाराचे साहित्य व 1 लाख 83 हजार रुपयांच्या 6  मोटार सायकली जप्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.