Government Hostel Admission : पुणे जिल्ह्यातील चांडोली येथील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

एमपीसी न्यूज – शैक्षणिक वर्ष 2022 – 23 साठी खेड तालुक्यातील चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश (Government Hostel Admission) प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. वसतिगृहात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून आता फक्त विद्यालयीन आणि महाविद्यालीन विभागासाठी अर्ज वितरण करण्यात येत आहेत. 

 

 

या वसतीगृहात इयत्ता 8 वी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि. जा.  भ. ज. इ. मा. व. व खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ मुलांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारी अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

 

Eknath Shinde : शिंदे सरकार विजयी; विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 तर विरोधात 99

 

प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरुन पांघरुन व दरमहा खर्चासाठी  प्रत्येकी  500 रुपयेप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. स्वतंत्र संगणक कक्ष अद्यावत ग्रंथालय (Government Hostel Admission) यांची सुविधा उपलब्ध आहे.

 

 

अधिक माहितीसाठी अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे वसतिगृह अधीक्षक यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.