Pimpri Accident News : आजोबांसोबत निघालेल्या नातवाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; दुसरा नातू गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – आजोबांसोबत दुचाकीवरून आईकडे निघालेल्या नातवांना एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये एका नातवाचा मृत्यू झाला तर दुसरा नातू गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 24) सकाळी दहा वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर, पिंपरी येथे झाला.

इजान (पूर्ण नाव माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे.,तर सैफ (पूर्ण नाव माहिती नाही) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी इकबाल अब्दुल कादर शेख (वय 55, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक इंद्रजीत कुमार साकेत (वय 26, रा. हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन नातवांना घेऊन मोठी मुलगी आसमा हिच्याकडे फुगेवाडी येथे दुचाकीवरून जात होते. ते जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना वल्लभनगर येथील शेल पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे दोन्ही नातू खाली पडले. त्यात इजान याचा मृत्यू झाला. तर सैफ हा गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.