Bhosari News : माहेरहून पैसे, दागिने आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणि दागिने आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. तसेच तिला अश्लील शिवीगाळ करत सास-याने तिचा विनयभंग केला. याबाबत तिने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती, दीर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2017 पासून 1 एप्रिल 2021 या कालावधीत स्पाईन रोड, भोसरी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेला माहेरहून पैसे आणि दागिने घेऊन येण्याची वारंवार मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. सास-याने विवाहितेला अश्लील शिवीगाळ करून विवाहितेचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.