Chinchwad News : तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – भाड्याच्या खोलीत राहू न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. 1) रात्री वाल्हेकरवाडी येथे घडली.

गणेश गुलाब गिरी (वय 28) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत जखमी तरुणाचा भाऊ सोमनाथ गुलाब गिरी (वय 22, रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी संदीप उत्तम खवळे (वय 30, रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड. मूळ रा. आपटीगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा जखमी भाऊ गणेश हा वाल्हेकरवाडी येथील संत मोनिबाबा आश्रमाजवळ सिंग यांच्या बिल्डींगमध्ये भाड्याने राहतात. आरोपी संदीप याला गणेश यांनी त्यांच्या भाड्याच्या रूममध्ये राहू दिले नाही. या कारणावरून चिडून आरोपीने गणेश यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये गणेश यांच्या डोक्यावर, हातावर गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.