Bhosari News : ट्रिपलसीट आलेल्या दुचाकीस्वाराकडून महिला वाहतूक पोलीसचा विनयभंग

एमपीसी न्यूज – ट्रिपलसीट असलेल्या एका दुचाकीस्वाराला दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस महिलेला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार शनिवारी (दि. 20) दुपारी फुगेवाडी चौक, दापोडी येथे घडला. याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आब्दुल सलाम अईनुल हक अन्सारी (वय 48, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत वाहतूक पोलीस महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहतूक पोलीस महिला शनिवारी दापोडी येथील फुगेवाडी चौकात वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी एका दुचाकी (एम एच 12 / ई वाय 5168) वरून तिघेजण आले. फिर्यादी यांना पाहून त्यातील एकजण काही अंतरावर उतरला. हा प्रकार फिर्यादी यांनी पाहिला.

त्यामुळे दुचाकीस्वार अन्सारी याला ट्रिपलसीट आल्याबाबत वाहतूक दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून अन्सारी याने ‘शरम करो तुम लोग. कितना झूट बोलते हो’ असे म्हणत अपशब्द वापरून वाहतूक पोलीस महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अन्सारी याने अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.