Dehuroad News : किराणा दुकान फोडून रोकड लंपास 

एमपीसी न्यूज –  किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 1 हजार 468 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी राधिकानगर, तळवडे येथे उघडकीस आली.

अरुण एकनाथ रिंगे (वय 30, रा. राधिकानगर, तळवडे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिंगे यांचे राधिकानगर येथे संकेत किराणा ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री दहा वाजता फिर्यादी यांनी त्यांचे दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून 1 हजार 468 रुपये चोरट्यांनी चोरून नेली देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.