Hinjawadi Fraud : 12 लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – बांधकामाचे पैसे न देता दिलेल्या चेकची पेमंट थांबवून चेक बाऊन्स केल्या प्रकरणी दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा (Hinjawadi Fraud) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2018 पासून 4 सप्टेंबर या कालावधीत झाला.

याप्रकरणी हरिश गुलाब वाघिरे (वय 34 रा. पिंपरी वाघिरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किरण भुमकर व अमर भुमकर दोघे राहणार वाकड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali Theft Case : पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डिसेंबर 2018 पासून आरोपीला मॅग्नोवा रिअल्टी या प्रकल्पामध्ये विन्डों व एस एस ग्लास रेलींगचे काम 50 लाख 33 हजार 900 रुपयांना दिले होते. त्यानुसार 37 लाख 55 हजार 500 रुपये दिले. काम झाल्यानंतर 12 लाख 78 हजार 408 रुपये देणे बाकी होते. त्यानुसार पैशांची मागणी केली असता आरोपींनी त्यानुसार  25 ऑक्टोबर 2021 रोजी 6 लाख 39 हजार 54 रुपयांचे कोटक महिंद्रा बँकेचे दोन चेक दिले. मात्र, फसवणूकीच्या हेतूने चेकचे पेमेंट स्टॉप करत चेक बाऊन्स केले. फसवणूक (Hinjawadi Fraud) झाल्यामुळे फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.