Teacher’s Day : न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड प्रशालेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – चिंचवड शिक्षण प्रसारक (Teacher’s Day) मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड या प्रशालेमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांचा आमदार उमा खापरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ चिंचवडे, तानाजी निंबाळकर आदी उपस्थित होते. प्रथम भारतरत्न सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शिक्षक दिन हा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. शिक्षकांच्या समाजातील योगदानाची आठवण ठेवून शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा 1962 पासून देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

खापरे म्हणाल्या, समाजाच्या आणि (Teacher’s Day) आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. आई-वडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरू असतात, जे आपल्याला योग्य-अयोग्य यातला फरक समजावून देतात. आपल्याला अक्षरे गिरवायला शिकवतात, आपल्या हिताचा विचार करतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात.

Guardian Minister: जिल्हा पालकमंत्र्यांविना; सूचना ऐकायच्या कोणाच्या? अधिकाऱ्यांची कोंडी!

याप्रसंगी प्रशालेतील सर्व विभागाच्या प्रमुखांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. सुनील चिंचवडे, अनिल झेंडे, चारुहास चिंचवडे,  योगिता बनकर, माधवी कुलकर्णी या सर्वांचा संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार खापरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन सुनंदा मुळूक यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.