Alandi Crime News : हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एक महिला हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी गेली असता हॉटेल चालकाने तिच्याकडून पैसे घेतले नाहीत. मात्र, त्यानंतर महिला हॉटेलमधून बाहेर जात असताना तिचा हात पकडून हॉटेल चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री आळंदी येथील नगरपालिकेच्या पार्कींगमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये घडली.

पद्माकर शंकर काळे (वय 54, रा. वडगाव रोड आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोपीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी हॉटेलमध्ये मिसळ खाल्ली. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. त्यानंतर फिर्यादी हॉटेलमधून बाहेर जात असताना आरोपीने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी देत, महिलेचा विनयभंग केला.

याप्रकरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.