Temple Reopen : शहरातील मंदिरे उघडली! मोरया गोसावी मंदिरामध्ये महापौरांच्या हस्ते आरती

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरातील मंदिरे उघडण्यात आली आहेत. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर, मनसेने आकुर्डीतील खंडोबा मंदिरात महाआरती केली.

राज्य शासनाने सर्व भक्ती स्थळे खुली करण्याची परवानगी दिली असली, तरी नागरिकांनी नियमाचे उल्लंघन न करता शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे तसेच सूचनांचे पालन करा असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले. राज्य शासनाने आज सर्व धार्मिक स्थळे कोरोना विषयक नियमांचे पालन करुन खुली करण्यास परवानगी दिलेली आहे. त्या निमित्ताने चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये महापौरांच्या हस्ते आरती करण्यात आली.

‘ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक आप्पा बागल, गजानन चिंचवडे, राजु दुर्गे, उर्मिला काळभोर, वारकरी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष विजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते तानाजी काळभोर, योगेश चिंचवडे, उज्वला गावडे, महावीर महाराज सुर्यवंशी, उध्दवबुवा कोळपकर, रामलिंग महाराज मोहिते, विजय भोडवे, ह.भ.प. माऊली आढाव, शेखर चिंचवडे आदी उपस्थित होते.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या, शासनाने सर्व भक्ती स्थळे खुली करण्याची परवानगी दिली असल्यामुळे सगळीकडे आनंदमय वातावरण तयार झाले आहे. परंतु, कोरोना वाढणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहीजे. दर्शन घेताना सुरक्षित अंतर ठेवा. सॅनिटायझरचा वापर करावा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा. शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे तसेच सुचनांचे पालन करा, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, सांगवी येथील गजानन महाराज मंदिरामध्येही आज सकाळी महापौर ढोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे, दिलिप तनपुरे, संतोष ढोरे, जवाहर ढोरे, सोनम गोसावी, दर्शना कुभांरकर, धनंजय ढोरे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे अखेर महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि महाराष्ट्रातील मंदिराचे दरवाजे उघडल्याचा दावा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला. मनसेच्या वतीने आकुर्डीतील खंडोबा मंदिरात चिखले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

मनसेचे सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन मिरपगार, सुरेश सकट, विष्णू चावरीया, विनोद भंडारी, राजू येवते,निलेश ननावरे, तुकाराम शिंदे, के के कांबळे, निलेश कांबळे, रोहन कांबळे,देवेंद्र निकम, सागर सोनटक्के, नारायण पठारे, संजय मोरे, विक्रम सोरटे, प्रफुल्ल कसबे, किसन हांडे, पप्पू शिंदे, मंगेश गायकवाड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.