Wakad Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला, असल्याची फिर्याद विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती अंकुश कुंडलिक पानमंद (वय 37, रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सन 2017 ते 21 डिसेंबर 2021 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने त्याच्या फिर्यादी पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुलाला फिर्यादींबाबत बदनामीकारक सांगितले. फिर्यादी त्यांच्या मैत्रिणींसोबत आंध्र प्रदेश येथे बालाजी दर्शनास गेल्या असता त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली.

घरात लागणा-या गृहोपयोगी वस्तू आणण्यास सांगितल्याने फिर्यादीसोबत वादावादी करून त्यांना मारहाण करत छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.