IAS Officer Crime : ‘त्या’ आयएएस अधिकाऱ्याच्या कॉम्प्युटरमध्ये सापडल्या 3500 अश्लील क्लिप्स

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी एका माजी आयएएस (IAS Officer Crime) अधिकाऱ्याला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने त्याला शनिवारी ही शिक्षा सुनावली.

मारुती हरी सावंत असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. 2015 मध्ये त्याने तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, तर अन्य तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला होता. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपी मारुती हरी सावंत हा 1998 च्या बॅचचा पदोन्नत झालेला आयएएस अधिकारी होता. या घटनेनंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

याप्रकरणी अधिक माहिती, मारुती सावंत हा पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. सिंहगड रस्ता परिसरातील त्याच्या सासरच्या अपार्टमेंटमध्ये वारंवार येत होता. याच ठिकाणी हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. जवळच असणाऱ्या एका शाळेतील विद्यार्थिनी या ठिकाणी मैदानावर खेळण्यासाठी येत होत्या. यावेळी आरोपी त्यांना चॉकलेट आणि बिस्किट देण्याचं अमिष दाखवून सासरच्या फ्लॅटवर घेऊन जायचा. तेथे त्यांना अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवायचा आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. या शाळकरी मुलींनी त्यांच्या शाळेतील समुपदेशकांना याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

Dr Sadanand Raut : पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट कमी खर्चात सर्पदंशाविरूद्ध प्रभावी लस तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा (IAS Officer Crime) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मारुती सावंत यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कॉम्प्युटरमधून जवळपास 3500 अश्लील व्हिडिओ जप्त केले. त्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात आले होते. आता या माजी आयएएस अधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.