India Corona Update : देशात चोवीस तासांत 3,55,338 जणांना डिस्चार्ज, 3,48,421 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागील 24 तासांत देशात 3 लाख 55 हजार 338 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 3 लाख 48 हजार 421 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाच्या रिकव्हरी रेट मध्ये वाढ झाली असून तो 83.04 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 37 लाख 04 हजार 099 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 205 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.08 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 30 कोटी 75 लाख 83 हजार 991 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 83 हजार 804 चाचण्या मंगळवारी (दि.11) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.