India Corona Update : गेल्या 24 तासांत 27,553 नवे कोरोना रुग्ण, 9,249 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा वेग धरला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 9 हजार 249 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या सध्याच्या घडीला देशात 1 लाख 22 हजार 801 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 48 लाख 89 हजार 132 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 42 लाख 84 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 9 हजार 249 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील वाढून 98.27 टक्के एवढा झाला आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 284 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 81 हजार 770 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा झाला आहे. लसीकरणात देश आघाडीवर असून आजवर 145.44 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

दरम्यान, भारतात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,525 झाली असून, त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 460 तर दिल्लीत 351 रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 1,270 पैकी 560 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.