India Corona Update : 147 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 4 लाखांच्या खाली

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 28 हजार 204 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, मागील 147 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. गेल्या 24 तासांत वीस टक्के रुग्णवाढ घटली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 41 हजार 511 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांच्या खाली आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 19 लाख 98 हजार 158 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 11 लाख 80 हजार 968 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 88 हजार 508 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 28 हजार 682 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 373 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.45 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 48 कोटी 32 लाख 78 हजार 545 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 11 हजार 313 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत 51 कोटी 39 लाख 14 हजार 567 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यापैकी 39 कोटी 96 लाख 66 हजार 293 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर, 11 कोटी 42 लाख 48 हजार 274 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.