Talegaon dabhade News : मन की बात मधून जनतेला प्रेरणा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – मन की बात द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचे मत भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे प्रसारित होणाऱ्या 89 व्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा मन की बात पश्‍चिम महाराष्ट्राचे संयोजक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

गोरखे म्हणाले, मन की बातच्या माध्यमातून गेले 89 महिने पंतप्रधान नरेंद्र  मोदी देशातील जनतेमध्ये प्रेरणादायी जागृती करण्याचे काम करत आहेत. मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील घडत असलेल्या प्रेरणादायी घटना तसेच सामाजिक काम या कार्यक्रमाद्वारे अखंडपणे प्रसारित होत असते. याला सर्वदूर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मावळवासियांनी हा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये चांगला संदेश दिला आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे,सत्यशीलराजे दाभाडे सरकार,किसान मोर्चा प्रदेश सचिव संतोष दाभाडे,जिल्हा कोषाध्यक्ष इंदरशेठ ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, माजी गटनेते अरुण भेगडे, माजी नगरसेवक अमोल शेटे, शोभाताई भेगडे, प्राचीताई हेंद्रे,जिल्हा सचिव संजय वाडेकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळोखे,भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे,माजी नगराध्यक्षा मीराताई फल्ले,माजी नगरसेवक श्रीराम कुबेर,सोशल मिडीया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम,कार्याध्यक्ष सचिन भिडे,व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल,ओबीसी कार्याध्यक्ष सचिन जाधव,

सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष गणेश उंडे,उपाध्यक्ष शेखर चौधरी,सरचिटणीस आशुतोष हेंद्रे,महिला मोर्चा सरचिटणीस तनुजाताई भेगडे, मृदुलाताई भावे,उपाध्यक्षा श्रीमती ज्योतीताई वैद्य, आरतीताई वाडेकर, वैभव कोतुळकर, ललित गोरे, आनंद दाभाडे, आप्पाराव ऐनापार्थी, अरुण हेंद्रे, बाळासाहेब तांबोळी,ओबीसी मोर्चा सदस्य दिपक खोंड,ओबीसी मोर्चा सचिव इशांत घाटकर,कामगार आघाडी सरचिटणीस आनंद पूर्णपात्रे,भाजयुमो सरचिटणीस अवधूत टोंगळे,संजीव वैद्य,विजय पंडीत, मकरंद मालकर, कैलास सांडभोर, आबा डंबे हे उपस्थित होते.

प्रास्तविक शहराध्यक्ष रविंद्र  माने यांनी केले.सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक,स्वागत शक्तीकेंद्रप्रमुख अमेय झेंडआणि आभार प्रदर्शन मन की बात संयोजक हिम्मतभाई पुरोहित यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.