Alandi News : आळंदीत मुख्य रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – आळंदी शहरात विकास आराखड्यामार्फत तयार झालेल्या नवीन मुख्य रस्त्यांवर कुठेही गतिरोधक बसवण्यात आले नव्हते. अंतर्गत रस्त्यांवर केवळ काही ठिकाणी तेथील प्रतिनिधींनी  मागणी केल्यानंतर तेथे गतिरोधक बसवण्यात आले होते. परंतु आळंदीमधील मुख्य रस्ते जोडणाऱ्या रस्त्यांवरच आवश्यक असलेल्या ठिकाणी गतिरोधके नसल्याने काही जड वाहने व इ. वाहने भरधाव वेगाने चालत होती.यामुळे नागरिकांना रस्ता पार करणे धोकादायक होते.

यावर्षी जुलै महिन्यात आळंदीमध्ये एक तरुण वारकऱ्याचा वडगांव चौकात तसेच एका चिमकुली मुलीचा वडगांव रस्त्यावरील गो शाळेसमोर जड वाहनांच्या धडकेने दोन अपघाती मृत्यू झाले.भविष्यात अशा दुर्घटना शहरात  होऊ नये  यासाठी तत्पर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व विविध मान्यवर यांनी नगरपालिका प्रशासनास मुख्य रस्त्यांवर आवश्यक तिथे गतिरोधक बसवण्यात यावे म्हणून निवेदन दिले होते. त्याची दखल घेत शनिवारी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक त्या विविध ठिकाणी  खडी डांबर मिश्रणांची गतिरोधक तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.