Khadakwasla Dam Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग केला बंद

एमपीसी न्यूज : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून (Khadakwasla Dam Update) मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 428 क्युसेक्स विसर्ग दुपारी 3 वाजता पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. असे यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी सांगितले.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. पूर्वी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1,712 क्युसेक्स विसर्ग कमी करून दुपारी 2 वाजता 428 क्यूसेक्स करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.