Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीची ही वैभवशाली परंपरा निरंतर राहू दे – महेश लांडगे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत; पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे वारकरी, भाविकांची सेवा

एमपीसी न्यूज – कोविडच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आषाढी वारी पालखी सोहळा (Ashadhi Wari 2022)  झाला नाही. मात्र, यावर्षी अत्यंत उत्साहाने राज्यभरातील वारकरी या भक्तीच्या मेळ्यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा अशीच निरंतर कायम राहू दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी करुयात, अशी भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

आळंदी- भोसरी पालखी मार्गावर मॅगझिन चौक येथे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. आषाढी वारी निमित्त (Ashadhi Wari 2022) राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी ज्ञानोबा- तुकाराम असा जयघोष करीत आणि टाळ- मृदंगाच्या गजरात पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Municipal Election 2022 : पुणे महानगरपालिकेकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर

यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. तसेच, प्रथमोपचार पेटी, फराळ, जीवनावश्यक वस्तुंचे कीट, छत्री, रेनकोट आदी वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी जगद् गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. विशेष म्हणजे, शहराला दोन खासदार, चार आमदार असतानाही पालखी सोहळ्यात आणि पालखीचे बैल हाकण्याची संधी योगायोगाने आमदार लांडगे यांना मिळाली. आमदार लांडगे यांनीही मोठ्या भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा केली. यासह पिंपरी-चिंचवडकरांना प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावे, अशी प्रार्थनाही केली.

Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द जसाच्या तसा… वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.