Lonavala News : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर

एमपीसी न्यूज – राज्यभरात नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजत आहेत. लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि नकाशे यांचा समावेश असून प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांची नगरपरिषद कार्यालयात लगबग सुरू झाली आहे.

प्रभागाची पुर्ण रचना, कोणता भाग कुठे समाविष्ट आहे, कोणता भाग वगळण्यात आला, चर्तुसिमा या सगळ्या बाबींचे निरसन या प्रभाग रचनेमध्ये करण्यात आले आहे. प्रभागरचना गोपनीय असावी असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत असले तरीही प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच पाहायला मिळते.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोणावळा नगरपरिषदेची काही प्रभाग रचना जाणीवपूर्वक प्रस्तापितांना धक्का असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे, तर आपण शहरासाठी केलेल्या कामाच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ असे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

लोणावळा सार्वत्रिक निवडणूक 2022

  • कोरोना संकटामुळे 2021 सालची जनगणना अद्याप झालेली नाही त्यामुळे दहा वर्षातील वाढलेली लोकसंख्या विचारात घेता यंदाच्या निवडणुकीत नगरपरिषदेत दोन सदस्य वाढवण्यात येणार आहेत.
  • यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 27 होणार आहे.
  • प्रभाग संख्या 13 असणार आहे.
  • लोणावळा शहराची लोकसंख्या 54119 असून त्यापैकी 7580 अनुसूचित जाती वर्गाची तर 2192 एवढी अनुसूचित वर्गाची आहे.
  • सार्वत्रिक निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असून ओबीसी लोकसंख्येचा वेगळा काॅलम दर्शवण्यात आलेला नाही.

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.