Maharashtra Corona Update : दिवाळीत रुग्णवाढ स्थिर, चार दिवसांत साडे तीन हजार नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – दिवाळीत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ एक हजारांवर स्थिरावली होती. मागील चार दिवसांत राज्यात साडे तीन हजार नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी (दि.06) राज्यात दिवसभरात 661 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 896 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 14 हजार 762 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 58 हजार 045 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.60 टक्के झाला आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या राज्यात 14 हजार 714 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 10 रुग्ण दगावले असून, आजवर 1 लाख 40 हजार 372 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 31 लाख 75 हजार 053 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 968 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 48 हजार 880 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.