Maharashtra Corona Update : राज्यात आज 35,453 रुग्णांची नोंद, 15,140 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) 35,453 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 15,140 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 77 लाख 21 हजार 109 एवढी झाली आहे. त्यापैकी 73 लाख 67 हजार 259 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 95.41 टक्के एवढा आहे.

 

राज्यात आज 39 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 42 हजार 611 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 2 लाख 07 हजार 350 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.

राज्यात आजवर 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.