Maharashtra Corona Update : राज्यात आज 806 नवे कोरोना रुग्ण, 2,696 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) दिवसभरात 806 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 2,696 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या 14,525 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 59 हजार 237 एवढी झाली आहे. आजवर 76 लाख 97 हजार 135 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.93 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 586 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजवर 7 कोटी 72 लाख 89 हजार 104 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.