Maharashtra Corona Update : 3427 नव्या रुग्णांची नोंद; 1550 जणांना डिस्चार्ज तर 113 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: 3427 new patients registered; 1550 were discharged and 113 died राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.2 टक्के झाले आहे. तर मृत्यूदर 3.7 टक्के आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज एकूण 1550 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजपर्यंत एकूण 49 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 113 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील  एकूण मृतांचा आकडा 3830 इतका झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज 3427 रुग्णांची भर पडली असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1550 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आजपर्यंत एकूण 49 हजार 346 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण 47.2 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 3.7 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 83 हजार 302 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1580 संस्थात्मक क्वॉरंटाईन सुविधांमध्ये 79,074 खाटा उपलब्ध असनू सध्या 28,200 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईन आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना चाचणी सुलभ व कमी दरात उपलब्ध होण्यास मदत होऊन चाचण्यांचे प्रमाण उघडू शकेल अशी आशा आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली आहे

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवत महाराष्ट्रात कोरोना नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता 38 हजार असली तरीही 14 हजार चाचण्या पार पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.