Bhosari : भाजपकडून महेश लांडगे यांनी तर विलास लांडगे यांनी नेला अपक्ष म्हणून अर्ज

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. तर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीकडून चार अर्ज नेले आहेत. भारतीय युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील अपक्ष अर्ज नेला आहे.

भाजपकडून सहयोगी आमदार महेश किसन लांडगे यांनी चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीपासून लांब राहणा-या विलास लांडे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. त्यांनी अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. लांडे अपक्ष लढण्याची शक्यता असल्याने भोसरी मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

राष्ट्रवादीकडून माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यांच्यासह शांताराम भालेकर यांनीही राष्ट्रवादीकडून अर्ज नेले आहेत. त्यांच्यासह एकूण 13 जणांनी 38  अर्ज नेले आहेत. तर, आजपर्यंत एकूण 21 जणांनी 51 अर्ज नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.