मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Maval Corona News : नवीन 130 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.14 )130 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 735 आहे.

शहरी भागात 75 रूग्ण तर ग्रामीण भागात 55 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 60 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 07 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 08 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 28,876 झाली आहे. तर दिवसभरात 76 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

शुक्रवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात गहुंजे येथे 08 रूग्ण सापडले. सोमाटणे येथे 07 रुग्ण सापडले. कामशेत व कुसगाव बुद्रुक येथे प्रत्येकी 06 रूग्ण सापडले. वराळे येथे 04 रुग्ण सापडले. चावसर व कान्हे प्रत्येकी 03 रूग्ण सापडले. ब्राम्हणवाडी (साते), माळवाडी व आंबळे येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले . तर थुंगाव, आंबी, शिळाटणे, काले, औंढे खुर्द, कुणे नामा, नाणे, करंजगाव, कुरवंडे,दिवड,आढले खुर्द व सुदुंब्रे येथे प्रत्येकी 01रुग्ण सापडला. असे एकूण 55 रुग्ण सापडले.

27,616 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,296 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,784 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,433 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,513 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,363 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.64 टक्के आहे तर मृत्यू दर 1.82 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 292 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 146 वडगाव नगरपंचायतमध्ये 36 व ग्रामीण भागात 261 असे एकूण 735 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

spot_img
Latest news
Related news