Maval News: भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी बवरे तर कोषाध्यक्षपदी ओसवाल यांची निवड

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी निवडी जाहीर केल्या आहेत. या निवडीमध्ये मावळ तालुक्याला झुकते माप देण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा भाजपच्या सरचिटणीसपदी मावळ येथील अविनाश बवरे तर कोषाध्यक्षपदी इंदरमल ओसवाल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातून आठ उपाध्यक्ष, आठ सचिव, चार सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि सहकोषाध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी निवडी जाहीर केल्या आहेत. या निवडीमध्ये मावळ तालुक्याला झुकते माप देण्यात आले आहे.

यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खासदार गिरीश बापट, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी आमदार बाबुराव पाचार्णे, शरद ढमाले आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..

उपाध्यक्ष – दादासाहेब सातव (हवेली पू), स्नेहल दगडे (हवेली म), वैजयंती उमरगेकर (खेड/आळंदी), प्रशांत सातव (बारामती), प्रदीप पाटील (इंदापूर), जयश्री पोकळे (हवेली प), राहूल शेवाळे (हवेली म), प्रवीण काळभोर (हवेली पू )

सरचिटणीस- अ‍ॅड धर्मेंद्र खांडरे (शिरूर), अविनाश बवरे (वडगाव मावळ), अविनाश मोटे (बारामती), सुदर्शन चौधरी (हवेली पू) .

सचिव- तानाजी थोरात (इंदापूर), अशोक पांगारे (भोर), सुवर्णा जोशी मुळशी, पूनम चौधरी (हवेली पू), रोहिदास भोंडवे (जुन्नर), अॅड अमृता देशमुख (खेड), संगीता जगताप (खेड), अनिल नवले (शिरूरबेट).

कोषाध्यक्ष- इंदरमल ओसवाल (तळेगाव दाभाडे (मावळ))
सह कोषाध्यक्ष- विकास जगताप (हवेली पू).

अविनाश बवरे यांनी यापूर्वी जिल्हा सचिव, उपाध्यक्ष व तीन वेळा सरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. ते कुशल संघटक म्हणून सुपरिचित आहेत. तर त्यांच्याकडे मावळसह खेड, आळंदी, चाकण व मुळशी या भागाची संपर्क प्रमूख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

तर तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध उद्योजक इंदमल ओसवाल हे अत्यंत अभ्यासू व अनुभवी असे नेते असून त्यांनी रूपी सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत होते आणि पक्षाच्या कामासाठी मोठे योगदान दिलेले आहे. तीन विधानसभा निवडणुकीत ओसवाल यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती, म्हणून त्यांच्याकडे पक्षाने जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.