Maval News : अवकाळी पावसाने मावळला झोडपले; बळीराजा संकटात

एमपीसी न्यूज:  मावळ परिसरात शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक तसेच दुकानाच्या बाहेर दुकाने मांडलेल्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. मावळ भागातील शेतक-यांना देखील या पावसाचा फटका बसणार आहे.

शुक्रवारी सकाळपासून पिंपरी-चिंचवड शहर, मावळ परिसरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ढग अंधारून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास पाउस पडला. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

सध्या ज्वारी, गहू, हरभरा आदि पिकांची काढणी सुरु आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडते. ज्वारी काळी पडल्यास ज्वारीचे भाव उतरतात. याचा शेतक-यांना आर्थिक फटका बसतो. भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान होते.

हवामानशास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती परिसरात ढगाळ वातावरण असल्याचे ट्वीट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.