Chinchwad News : डोक्यात बांबू मारुन विद्यार्थ्यांचा हिसकावला मोबाईल आणि स्मार्ट बॅन्ड

एमपीसी न्यूज – डोक्यात बांबू मारुन पादचारी विद्यार्थ्यांचा मोबाईल व स्मार्ट बॅन्ड हिसकावला आहे. काळभोर नगर, चिंचवड येथे शनिवारी (दि.12) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

करण सुनील शिर्के (वय 24, रा. रुपी नगर, तळवडे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण हे चिंचवड स्टेशन वरून निगडी पायी चालत जात होता. काळभोर नगर येथील ग्रिव्हज कंपनीसमोर आल्यावर फिर्यादी करण यांना दुचाकी वरुन आलेल्या चार अनोळखी इसमांनी अडवून शिवीगाळ केली व डोक्यात लाकडी बांबूने मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडील मोबाईल व स्मार्ट बॅन्ड हिसकावला असे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.