Chinchwad News : आळंदी, भोसरी, निगडी परिसरात मारलेल्या चार छाप्यांमध्ये दोन किलोपेक्षा अधिक गांजा जप्त

एमपीसी न्यूज – आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार ठिकाणी छापे मारले. यामध्ये एक लाख 11 हजार 100 रुपये किमतीचा दोन किलोपेक्षा अधिक गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. 

आळंदी पोलिसांनी खेड तालुक्यातील गोलेगाव येथे छापा मारून एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली. दिगंबर रघुनाथ चौधरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी कडून 48 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी भोसरी येथील मुस्लीम शाही कब्रस्तान गेट समोर 52 वर्षीय व्यक्तीला सापळा लावून पकडले. राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय 52, रा. भोसरी ब्रिज खाली. मूळ रा. मालीपारगाव, ता. माजलगाव, जि. बिड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 21 हजार 800 रुपये किमतीचा 882 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे निगडी पोलिसांनी कारवाई करून एकास अटक केली. निलेश नंदेश्वर चव्हाण (वय 35, रा. नवीन तरटे चाळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या एक किलो 298.5 ग्रॅम वजनाचा 35 हजार 750 रुपये किमतीचा गांजा जवळ बाळगला होता. पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी परिसरात आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ओटास्कीम निगडी येथे कारवाई करून पाच हजार 550 रुपयांचा 222 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अहमद रजा वाशीउज्जमा खान (वय 34, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.