Nigdi News : व्यावसायिकाला अश्लील मेसेज करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण परिसरातील एका व्यावसायिकाला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून बदनामी करण्याच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 5 ते 6 जून या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.

अमित मधुकर मेश्राम (वय 36, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याबाबत बुधवारी (दि. 23) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गजधने उर्फ जंगली (रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. आरोपी सचिन याने फिर्यादी यांना त्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अश्लील मेसेज केले. तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत आरोपी सचिन याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 294, 501, 506, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2010 कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.