MP SambhajiRaje : खासदार छत्रपती संभाजीराजे आज नव्या पक्षाची घोषणा करणार?

एमपीसी न्यूज : राज्याच्या राजकारणात विविध मुद्द्यांवरून वाद सुरू असताना आता खासदार छत्रपती संभाजीराजे (MP SambhajiRaje) यांनी आपली पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यावेळी ते नव्या पक्षाचे घोषणा करण्याची शक्यता आहे. 

राज्यभरातील मराठा बांधव या पत्रकार परिषदेतील राजेंचं म्हणणं जाणून घेण्यासाठी येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवी दिशा, नवा विचार, नवा पर्याय, अशी टॅगलाईन देऊन मराठा बांधवांना पुण्यात बोलावण्यात आलं आहे. परिणामी सर्वत्र सध्या याचीच चर्चा आहे.

राज्यभरातील विविध भागातील माजी खासदार-आमदार संभाजी राजेंच्या संपर्कात असून राजे राजकारणात नव्या पक्षासह जोरदार एंट्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sambhajiraje : खासदार संभाजीराजे लढवणार ‘अपक्ष’ निवडणूक

संभाजी राजेंनी गेल्या काही वर्षांपासून मराठा बांधवांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आंदोलनं केली आहेत. मराठा मोर्चाच्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित करण्याचं काम संभाजी राजेंनी केलं होतं. संभाजीराजे (MP SambhajiRaje) लवकरच राज्याचा दौरा करून आपल्या सर्व सहकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचं सध्यातरी दिसत आहे. दरम्यान, खासदार संभाजी राजेंची राज्यसभेतील मुदत आता संपत आली आहे. परिणामी पुन्हा संभाजी राजे राज्यसभेत दिसणार का?, अशी चर्चा देखील रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.