Mumbai Building Collapse : कुर्ल्यात कोसळली चार मजली इमारत, 11 जण मृत्युमुखी

एमपीसी न्यूज : पावसाळा सुरु होत नाही (Mumbai Building Collapse) तोवर मुंबईमध्ये दुर्घटनेला प्रारंभ झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील कुर्ला येथे चार मजली इमारत कोसळली असून त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप तेथे मदतकार्य सुरु आहे. आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरात सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हि घटना गंधाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांना ढिगाऱ्यामधून वाचवण्यात यश आले असून जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे –

कुशर प्रजापती, अजय भोले पासपोर, अजिंक्य गायकवाड, अनुप राजभर, अरविंद यादव, सिकंदर राजभर, अरविंद भारती, शाम प्रजापती तर इतर दोघांची ओळख पटलेली नाही.

तसेच, मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे मृतांच्या कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मदत देण्यात येणार असल्याचे मंगेश कुडाळकर यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.