Pune News : पुणे, पिंपरी – चिंचवडमधील अनेक रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले नाही – पार्थ पवार

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा व दोन्ही महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयाच्या फायर ऑडिट बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी ट्विट करुन पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवडमधील अनेक रुग्णालयांचे ऑडिट झाले नसल्याचे म्हटले आहे.

पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत गंभीर असून, निष्पाप रुग्णांचा होरपळून बळी जाण्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका स्तरावर तत्काळ उपाययोजना कराव्यात.’

पार्थ पवार यांनी करत ट्वीटमध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना टॅग केले आहे.

दरम्यान, नगर दुर्घटनेनंतर शहरातील शासकीय रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.