‘Omicron’ : ‘ओमिक्रॉन’ पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्यांसाठी नवी नियमावली

एमपीसी न्यूज : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ नामक अति घातक अशा विषाणूने पुन्हा एकदा जगाला धडकी भरली आहे. त्यामुळे देशात देखील त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या उपाय योजना आखण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा सर्व देशांनी प्रवास नियमांवर काही निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भारत सरकारने देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत.

 

1 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नियमांमध्ये बदल करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता प्रवाशांना प्रवासापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणीची निगेटीव्ह रिपोर्ट अपलोड करणं बंधनकारक केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना येथे कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन समोर आल्यानंतर, भारत आपल्या प्रवास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करत आहे. ओमिक्रॉन स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंध शिथिल करण्याबाबत पुन्हा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नव्या व्हेरिएंटसोबत लढण्यासाठी मुंबई पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय रविवारी, सरकारनं सांगितलं की, 1 डिसेंबरपासून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट पोर्टलवर अपलोड करावा लागेल. त्याचबरोबर प्रवाशांना त्यांनी शेवटच्या 14 दिवसांत केलेल्या प्रवासाचा तपशील द्यावा लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.