Nigdi : दरवाजाचे लॉक तोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 38 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी दीड ते साडे तीन या कालावधीत जनता वसाहत, प्राधिकरण, निगडी येथे घडली.

शंतनुकुमार सुमनकुमार अगरवाल (वय 25, रा. जनता वसाहत, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंतनुकुमार यांचे घर मंगळवारी दुपारी दीड ते साडेतीन या कालावधीत लॉक लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने दरवाजाचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला.

घरामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 2 लाख 38 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.