गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Nigdi : चालकांनी चोरला मिनी ट्रक

एमपीसी न्यूज – चालक म्हणून ठेवलेल्या दोघांनी मिनी ट्रक चोरला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.15) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Nigdi) आहे. हा ट्रक घेऊन 7 नोव्हेंबरपासून आरोपी फरार आहेत.

संजय कुमार गडगूखान (वय 38 रा.हरियाणा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संदीप कुमार लक्ष्मीनारायण (रा. हरियाणा) व राणीया (पूर्ण नाव माहिती नाही) रा. हरियाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

National wrestling tournament: राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची महिला पैलवान प्रगती गायकवाडला कांस्यपदक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या (Nigdi) ट्रकवर चालक म्हणून काम करत होते. फिर्यादी यांचा निगडी ट्रान्सपोर्टनगर येथे पार्क केलेला ट्रक (एच आर 56 बी 9340) असताना तो ट्रक घेऊन आरोपी फरार झाले आहेत. यावरून आरोपींवर 55 हजार रुपयांचा मिनी ट्रक चोरी प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest news
Related news