Subhash Desai : भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली सुभाष देसाई यांची भेट

एमपीसी न्यूज : केंद्र शासनाच्या भारतीय परराष्ट्र सेवेत (२०२१ तुकडी) नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.

भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झालेले रजत उभयकर, शायशा ओरके, सिमरन हे अधिकारी राज्य शासनाकडे तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक स्थिती, गुंतवणूक आदींची माहिती जाणून घेतली.

Artificial Limb Center : पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

देश-विदेशातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. उद्योग वाढीसाठी राज्य शासनाने विविध योजना आणि धोरणे आखली आहेत. त्याचे सकारात्मक परिमाण दिसत आहेत. कोविड काळात यामुळे तीन लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी गुंतवणुकदारांना मदत करण्यासाठी कंट्री डेस्क तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उद्योग मंत्री देसाई ( Subhash Desai) यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.