RTE Form : आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर, आता 16 फेब्रुवारी पासून अर्ज भरता येणार 

एमपीसी न्यूज – शिक्षणाचा अधिकार अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई अंतर्गत आता 16 फेब्रुवारी पासून अर्ज भरता येणार आहे. यापूर्वी ही तारीख 01 फेब्रुवारी होती. 

अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन 16 फेब्रुवारी पासून अर्ज दाखल करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.