Maharashtra Corona Update : बुधवारी 18,067 नवे कोरोना रुग्ण, 36,281 जणांना डिस्चार्ज  

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात  बुधवारी नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट डिस्चार्ज देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 18,067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 36,281 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील दोन लाखांच्या खाली आली आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 77 लाख 53 हजार 548 एवढी झाली आहे. त्यापैकी 74 लाख 33 हजार 633 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 95.87 टक्के एवढा आहे.

राज्यात बुधवारी 79 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 42 हजार 784 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 73 हजार 221 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.

राज्यात आजवर 7 कोटी 49 लाख 51 हजार 750 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.