New Delhi News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीत रथसंचलनात घडणार महाराष्ट्रातील जैवविधतेचे दर्शन

एमपीसी न्यूज : -यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. 

चित्ररथा द्वारे राज्यांतील संस्कृती, इतिहासातील महत्वपूर्ण घडामोडी, जैवविविधता व पर्यावरण अशा गोष्टींच प्रकटीकरण करण्यात येते. ह्यावर्षी महाराष्ट्रातील चित्ररथाचे वैशिट्ये म्हणजे युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे.

अनेक दुर्मीळ वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्लू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

दुर्मीळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.

महाराष्ट्रासह एकूण 12 राज्यांचे रथ संचलन दिसणार आहेत. दरवर्षी काही निकषांच्या आधारे चित्ररथाला संचलनात सहभागी होण्यासाठी परवानगी दिली जाते, महाराष्ट्रातील वातावरणातील बदल झालेला पाहता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र अग्रेसर आहे त्या अनुषंगाने चित्ररथाला मान्यता मिळाली.

याआधी 2015 साली चित्ररथाद्वारे ‘पंढरीची वारी’ व 2018 साली ‘शिवराज्याभिषेक’ दाखविण्यात आला होता या दोन्ही वेळी चित्र रथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.