Pune News : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यात दीड लाख वृक्षलागवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान’ 2 ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. या अभियानाचा दुसरा टप्पा पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून पासून सुरु झाला. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात दीड लाख वृक्षलागवड करण्यात आली आहे. तर, विभागात अडीच लाख वृक्ष लागवड  करण्यात आली आहे.

पुणे महसूल विभागातील सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या पाच जिल्हयात विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान  राबविले जात आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 92 हजार, पुणे महानगरपालिकेत 18 हजार 446, आळंदी 1 हजार 236, बारामती 13 हजार, भोर 1 हजार 250, चाकण 1 हजार 500, दौंड 1 हजार 519, इंदापूर 2 हजार 821, जेजुरी 984, जुन्नर 975,लोणावळा 5 हजार 200, राजगुरुनगर 190, सासवड 1 हजार, शिरुर 3 हजार 480, तळेगाव दाभाडे 4 हजार 874,वडगाव मावळ 2 हजार 330, मालेगाव 250 तर देहू 150 इतकी वृक्षलागवड करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात दहिवडी येथे 1 हजार 500, कराड 3 हजार, खंडाळा 2 हजार, कोरेगाव 500, लोणंद 500, महाबळेश्वर 2 हजार 100, मलकापूर 250, मेढा 250, म्हसवड 2 हजार, पाचगणी 2 हजार 800, पाटण 550, फलटण 2 हजार 100, रहिमतपूर 4 हजार 500, सातारा 6 हजार 950, वडूज 248 तर वाई 100 याप्रमाणे वृक्षलागवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हयात महानगरपालिका क्षेत्रात 13 हजार 399, बार्शी 10 हजार, अक्कलकोट 8 हजार, दुधानी 750, करमाळा 700, कुर्डूवाडी 600,मैंदर्गी 2 हजार 221, मंगळवेढा 780, मोहोळ 2 हजार 500, पंढरपूर 8 हजार, सांगोला 1 हजार 150,माढा 1 हजार, माळशिरस 750, वैराग 1 हजार 200, महाळूंगे श्रीपूर 250 इतकी झाडे लावण्यात आली आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 3 हजार 758, आजरा 120, हुपरी 280, शिरोळ 200,गडहिंग्लज 1 हजार 500, इचलकरंजी 1 हजार 800, कुरुंदवाड 200, पन्हाळा 1 हजार 800, मलकापूर 500 तर जयसिंगपूर 2 हजार 600 इतकी झाडे लावण्यात आली आहेत. सांगली जिल्हयात सांगली-मिरज-कूपवाड मध्ये 890, आष्टा 1 हजार 100, जत 300, पलूस 695, तासगाव 480, उरण इस्लामपूर 1 हजार 230, विटा 1 हजार 550, कडेगाव 700, कवठेमहाकाळ 1 हजार 15, खानापूर 950 तर शिराळा येथे 2 हजार इतकी वृक्षलागवड करण्यात आली.

अभियानाच्या दुसऱ्‍या टप्प्यात अमृत शहरे-8, नगरपरिषदा-47, नगरपंचायती-22 तसेच 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 104 ग्रामपंचायती तर 10 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 5 हजार 38 ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. म्हणजेच दुस-या टप्प्यात पुणे विभागातील 77 शहरी तर 5 हजार 142 ग्रामीण स्थानिक संस्थांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत 10 पट पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांची नोंदणी झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत 10 पट पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.