Wakad Crime News : पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 15) सायंकाळी सव्वापाच वाजता बारणे कॉर्नर, थेरगाव येथे करण्यात आली.

समीर रफिक अन्सारी (वय 26, रा. बोराडेनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार व्ही टी गंभीरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर याने त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसतानाही त्याने त्याच्या कब्जात बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगले. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी थेरगाव येथे बारणे कॉर्नर, प्रसुधान सोसायटी रोडवर सापळा लावला. आरोपी समीर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 22 हजारांचे एक गावठी लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत कडतुस जप्त केले. वाकड पोलीस याप्रकऱणी तपास करीत आहेत.

कोयता बाळगणाऱ्या तरुणाला बेड्या –

बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्या प्रकारणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. गौरव अरुण यशवंत (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) सायंकाळी सहा वाजता वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.